The Book "SAFAI KAMGAR SAMUDAY" Publish in Marathi Language.


'सफाई कामगार समुदाय` हे अभ्यासपूर्ण पुस्तक आहे
· विलास वाघ
मेहत्तर, भंगी इत्यादी सफाई काम करणात्या समाजाला सफाई कामगार शब्द वापराला जातो, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे काम करणारा हा समाज अत्यंत उपेक्षित राहिला आहे. या समाजाच्या प्रश्नांकडे फारसे कोणाचे लक्ष्य गेले नाही. आता हा समाज जागृत होत आहे. संघटित होत आहे. महाराष्टं दोन वेळा अभ्यास समित्या नेमल्या गेल्या. त्यांच्या काही शिफारसी मान्य झाल्या आहेत. हा समाज देशभर विखुरला गेला आहे. त्यामुळ त्याचे संघटन करणे अवघड आहे.
बिलासपूर, छत्तीसगढ़चे संवेदनशिल सामाजिक कार्यकर्ते व लेखक संजीव खुदशाह यांनी 'सफाई कामगार समुदाय` हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहीले, प्रत्येक राज्यात या समाजाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. चालीरीती रूढी. परंमरामध्ये थोडा फार फरक आहे. पण यांचे सामाजिक प्रश्न समान आहेत. हा समाज इतर समाजात मिलळत नाही आणि इतर समाजही यांना स्वीकारत नाही असा हा अपेक्षिला गेलेला समाज आहे.
खुदशाह यांनी ह्या समाजाचा बारकाईने अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. सफाई कामगार समाज कसा निर्माण झाला, त्यासंबंधी पुराणातले संदर्भ, सामाजिक स्थिती, सामाजिक प्रश्न, त्यावरील उपाय इत्यादींवर अभ्यासपूर्ण विचार श्री खुदशाह यांनी मांडले आहेत.
या पुस्तकावर अनेक ठिकाणी चर्चा झाली आहे, समीक्षा झालेली आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठातील अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश झाला आहे. पंजाबी भाषेत याचे भाषांतर झाले आहे. महाराष्टंतील सामाजिक विषयांवरील लेखक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आयु. भीमराव गणवीर यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. याविषयावर मराठीत गणवीर यांनी भाषांतर केले आहे. भाषांतर उत्तम झाले आहे. मूळ विषयाचा आशय त्यांनी जपला आहे. संजीव खुदशाह आणि भीमराव गणवीर यांना मराठी वाचकांकडून धन्यवाद.
समीक्षित कृति:- सफाई कामगार समुदाय
लेखक :- संजीव खुदशाह
अनुवादक:- भीमराव गणवीर
पृष्ठ सं. :-९५ मूल्य :- ७०रू.
प्रकाशक :-सुगावा प्रकाशन, ५६२ए सदाशिव पेठ, पुणे-३० महाराष्ट्र
Phone:-24478263
Fax:-24479228

2 comments:

We are waiting for your feedback.
ये सामग्री आपको कैसी लगी अपनी राय अवश्य देवे, धन्यवाद